Dailyhunt
'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दुग्धाभिषेक अन् पुन्हा अटक.

'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दुग्धाभिषेक अन् पुन्हा अटक.

कोल्हापूर : दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक आणि दुग्धाभिषेक घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, चौघांना अटक करण्यात आली.

आरोपी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय 21, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हा मोक्कातील आरोपी असून त्याच्यावर दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात कारवाई झाली आहे. 2021 पासून त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली होती. अनिकेत याची 24 डिसेंबरला जेलमधून सुटका झाली होती. यानंतर त्याच्या स्वागताला अगदी पाठिराख्यांपासून ते नातेवाईक सुद्धा हजर होते. जेलपासून त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दारात रांगोळी काढून खूर्चीवर दुग्धाभिषेकही करण्यात आला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई केली असून चौघांना अटक करण्यात आली. शिवाय, पोलिसांनी एक कार आणि दोन दुचाकी सुद्धा जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी अनिकेत अमर सूर्यवंशी, गब्बर उर्फ आदित्य अमर सूर्यवंशी, अनुराग दिलीप राखपसारे, करण उर्फ तुषार सिद्धू कुमठे, सागर कैलास गौडदाब, प्रथमेश कुमार समुद्रे आणि वेदांग शिवराज पोवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गब्बरल सोडून इतराच्या पोलिसांनी पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. टोळीची दहशत पुन्हा बसवण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आरोपी अनिकेतची सुटका झाल्यानंतर त्याची कळंबा जेल पासून ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. स्वागतासाठी दारात मंडपही घालण्यात आला होता. रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती. यानंतर दारात पोहोचताच त्याचे औक्षण करून दुग्धाभिषेकही करण्यात आला. व्हिडिओ व्हायर झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. रिल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…

कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक…

कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…

The post ‘मोक्का’तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दुग्धाभिषेक अन् पुन्हा अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka