Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी.

मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी.

कोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित शिक्षिकेने आंदोलनाचा मार्ग स्वीकरला आहे. या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक युवतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. अकोट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून असलेल्या या युवतीकडे शाळेतील मुख्याध्यापकानेच शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून शाळेचे मुख्याध्यापक आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही या शिक्षिकेने केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणात मुख्याध्यापकाविरुद्ध अकोट शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल असला तरी अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असा आरोपही या युवतीने केला आहे. विद्यालयात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकावर अटकेची कारवाई करत तात्काळ त्याचे निलंबन करावे, या मागणीसाठी शिक्षिकेने आमरण उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षिकेविरूद्धही आरोपी मुख्याध्यापकाच्या पत्नीने ब्लॅकमेलींगची तक्रार केली आहे. मुख्याध्यापका विरुद्धच शिक्षिकेने आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…

The post मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka