Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन

मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन

पुणे: मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे सोमवारी (ता. ७) अल्पशा आजाराने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. सागर धुमाळ यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर धुमाळ यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ. शेतकरी कुटुंबातील त्यांना जन्म. गरिब कुटुंबातून ते पुढे आले होते. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक गुन्हे उघड करताना त्यांना सर्वसामान्य नागरिकांना मदत केली होती. सोशल मीडियावरही ते सक्रीय होते. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक युवकांना ते मार्गदर्शन करत होते.

सागर धुमाळ यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांसोबत त्यांची मैत्री होती. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समजताच शिरूर तालुक्यातून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगी आणि मुलगा, आई-वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे.

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka