Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून.

नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून.

नाशिकः नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका बापाने रागाच्या भरात आपल्या 9 वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत भरून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची संतापजनक घटना घडली आहे.

सुमित पुजारी असे बापाचे नाव आहे. या घटनेनंतर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. सुमित पुजारी (वय 35) असे आरोपी बापाचे नाव आहे. त्याने आपल्या मुलगा गणेश पुजारी (वय ९) याची हत्या केली. कौटुंबिक वादातून झालेल्या वादानंतर रागाच्या भरात बापाने स्वतःच्या मुलाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुमित पुजारी हा गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. घरामध्ये सतत वाद होत होते. घरामध्ये झालेल्या भांडणानंतर त्याने मुलाचा गळा आवळून खून केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेच्या तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे एक शोधपथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं…

नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…

नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…

नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग…

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka