Dailyhunt
मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं.

मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं.

नाशिक: तडीपार सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (वय 27, रा. शहा, सिन्नर, नाशिक) याची गावातीलच 14 जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे.

याप्रकरणी 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रवीण कांदळकर हा दोन वर्षांच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला होता. शहा गावातीलच गोराणे नावाच्या कुटुंबीयांशी त्याचे भैरवनाथाच्या यात्रेत वाद झाले होते. तेव्हापासून दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी सौरभ गोराणे, दिनेश गोराणे, वाळीबा गोराणे, शरद गोराणे, विजय गोराणे, सचिन बागल, राहुल बागल, अतुल गोराणे, आबा गोराणे, रवींद्र गोराणे, वैभव गोराणे, दगू साप्ते (पाहुणा अस्तगावकर), गणेश सोनवणे, सर्जेराव गोराणे (सर्वजण रा. शहा ता. सिन्नर) हे हातात कोयता, कुऱ्हाडी, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेऊन त्याच्या घरात शिरले.

टोळक्याने प्रथम कांदळकरला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला बाहेर ओढून आणत अंगणात टाकून देत पळ काढला. जखमी अवस्थेत भैया कांदळकर याला त्याचे वडील आणि चुलत भावाने तातडीने वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याची आई विजया कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, सिन्नर एमआयडीसी व वावी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शहाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करत आहे.

दरम्यान, तडीपार असतानाही भैय्या कांदळकर गावात येऊन सर्रास गुन्हे करत होता. तालुक्यात आणि शहा परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. दोन वर्षांपूर्वी तडीपार असताना तो गावात आला होता. वावी, मुसळगाव आणि सिन्नर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शहा येथील घराभोवती सापळा रचला होता. यावेळी त्याने पोलिसांवर बंदूक रोखली होती. पोलीस कारवाईला अडथळा केला म्हणून त्याची पत्नी, वडील आणि आई यांनाही अटक झाली होती. वावी पोलिसात त्याच्यावर 16 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…

नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…

नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग…

नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…

नाशिक शहर पोलिस :

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka