नवी मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे भागात बुधवारी (ता. १) आई आणि मुलाची राहत्या घरात मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. समलैंगिक संबंधाच्या मागणीवरून हत्या झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये 1 जानेवारीला गीता भूषण जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी (वय ४५) हे दोघं घरामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळले होते. बुधवारी संध्याकाळी घरातून गॅस गळती होत असल्याचं लक्षात आल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी दार वाजवले, पण कुणीही दार उघडले नाही, त्यामुळे रहिवाशांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावले होते.
पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर ते लगेचच सोसायटीमध्ये दाखल झाले. घर आतून बंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एका बेडवर महिलेचा तर दुसऱ्या बेडवर त्यांच्या मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. पोलिसांनी पुढील तपास केल्यावर माहिती समोर आली आहे.
मृत्यू झालेल्या जितेंद्रने दोन्ही आरोपींकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली होती. यावरून आरोपी आणि जितेंद्र यांच्यात वाद झाला होता. त्यातून आरोपीने जितेंद्रला ठार मारले. याशिवाय आरोपीने जितेंद्रच्या आईलाही डोक्यात वार करून हत्या केली. मृत जितेंद्र आणि आरोपी जितेंद्रच्या घरी जातानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या प्रकरणातला आरोपी 19 वर्षांचा असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवी मुंबईत पोलिसांनी दरवाजा उघडला अन् आढळा माय-लेकाचा मृतदेह…
पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी…
तुळजापूरमधील सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव; पोलिस तपासात कारण समोर…
दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव…
भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…
The post नवी मुंबईतील दोघांची राहत्या घरातील हत्या समलैंगिक संबंधातून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

