Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी.

पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी.

मुंबई : पोलिस हवालदाराला धावत्या रेल्वे समोर ढकलून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतमधील रबाळे-घणसोली रेल्वे स्थानका दरम्यानच्या रुळावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विजय रमेश चव्हाण (वय ४३) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे.

विजय रमेश चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनला कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात वरून वाशीचा दिशेने येणाऱ्या रेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना सांगितले की, बुधवारी सकाळी 5.25 ते 5.32 च्या दरम्यान पांढऱ्या शर्टातील दोन अनोळखी व्यक्तींनी विजय चव्हाण यांना रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ढकलले. प्रथमदर्शीनी गळा दाबून मारण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर रेल्वे समोर ढकलल्याचे निष्पन्न झाले आहे.

वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार रमेश चव्हाण यांना या दोन व्यक्तींनी रेल्वे रुळावर का ढकलले? याचं कारण अद्याप समोर आले नाही. शिवाय, मारेकऱ्यांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी रेल्वे पोलिस करत आहेत.

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!

हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

The post पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka