Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले.

नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले.

सांगली : भाजप आमदार नितेश राणे यांनी भर सभेत थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असे ते म्हणाले.

राणे यांच्या वक्तव्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले आहे. लव्ह जिहाद वर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम भरला. सरकार हिंदूचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायको फोनपण लागणार नाही, अशा भाषेत नितेश राणे यांनी पोलिसांना दम दिला. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो.

पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे. उरण आणि धारावी हत्याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी याआधीही पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असे ते म्हणाले होते. तसेच आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असेही ते म्हणाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka