Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्कर विनिंग अभिनेत्याचा कारमध्ये सापडला मृतदेह.

ऑस्कर विनिंग अभिनेत्याचा कारमध्ये सापडला मृतदेह.

सेऊल (साऊथ कोरिया) : ऑस्कर विनिंग फिल्म पॅरासाइटमधील प्रसिद्ध अभिनेता ली सन क्युन (वय ४८) याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

ली सन क्युन ड्रग्ज आणि नशा असणाऱ्या औषधांचा वापर करत होता. सेंट्रल सोलच्या एका कार पार्किंगमध्ये एक व्यक्ती कथित स्वरूपात बेशुद्ध अवस्थेत सापडला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवल्यानंतर तो व्यक्ती अभिनेता ली सन क्युन असल्याची माहिती समोर आली. एक दिवसाआधीच ली सन क्युन याची ड्रग्ज एब्यूज केस संदर्भात चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत अभिनेत्याने तो ड्रग्जचं सेवन करत नसल्याचे सांगितलं होतं आणि चौकशीच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेता मृतावस्थेत आढळला. अभिनेता ली सन क्युनच्या कारमध्ये काही जळालेल्या चारकोल ब्रिकेटचे पुरावे सापडले आहे. ड्रग्ज प्रकरणामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेता ली सन क्युन हा अनेक वर्ष दक्षिण कोरियाई सिने इंडस्ट्रीत काम करत होता. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते जगभरात आहेत. पॅरासइट हा त्याचा सर्वात मोठा सिनेमा होता. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड देखील मिळाला आहे. माई मिस्टर, कॉफी प्रिंस माई स्वीट सियोल, मिस कोरिया आणि अ हार्ड डे सारख्या चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.

अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post ऑस्कर विनिंग अभिनेत्याचा कारमध्ये सापडला मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka