Dailyhunt
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या.

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या.

हैदराबाद : लोकप्रिय अभिनेत्री शोभिता शिवन्ना (वय ३०) हिचा रविवारी (ता. १) घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शोभिता हिने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री शोभिता हिने 30 नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. मूळच्या कर्नाटकची असलेल्या शोभिताने लग्न केले होते. त्यानंतर 2 वर्षांपासून ती हॉस्पिटलमध्ये राहत होती. शोभिताने टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेले नाही. शोभिताच्या मृत्यूने तिचे चाहते आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

शोभिताने कन्नड टीव्हीमधून करिअरला सुरूवात केली होती. काही वर्ष ती टीव्ही जगतात चर्चेतला चेहरा होती. शोभिताने 12 पेक्षा जास्त पॉप्युलर टीव्ही शोमध्ये काम केले होते. एटीएम, जॅकपॉट सारख्या अनेक चित्रपटांमध्येही शोभिताने अभिनय केला. कन्नड चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये शोभिता शेवटची दिसली होती, यातल्या तिच्या कामाचे कौतुकही झाले होते. सोशल मीडियावरही शोभिता चित्रपटाचे प्रमोशन करत होती. लग्नानंतर 2 वर्ष शोभिता हॉस्पिटलमध्ये राहून तेलुगू चित्रपटात संधी शोधत होती.

दरम्यान, शोभिता हिने 1 नोव्हेंबरला शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती, यात ती दिवाळी सेलिब्रेशनबद्दल बोलली होती. तसेच आपल्या नव्या चित्रपटाला पाठिंबा द्या, अशी विनंतीही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…

'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

The post प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka