Dailyhunt
पोलिसकाकाचा खून केल्या प्रकरणी हिवरी येथील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा.

पोलिसकाकाचा खून केल्या प्रकरणी हिवरी येथील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा.

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मारेगांव तालुक्यातील हिवरी येथील आरोपी अनिल लेतू मेश्राम (वय 41) याने मारेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांच्या डोक्यावर लाकडी दांडयाने मारुन खुन केल्या प्रकरणी न्यायाधीश 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.

एम. देशमुख (केळापूर) यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 10 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी 6 महिण्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

भादंवि कलम 307 मध्ये 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 3000 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी 3 महिण्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. भादंवि कलम 353 अंतर्गत 1 वर्षाची शिक्षा व 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी 1 महिण्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. भादंवि कलम 333 अंतर्गत 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 2000 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी 2 महिण्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. विशेष म्हणजे आरोपी अनिल मेश्राम यांस सर्व शिक्षा एकत्रीतपणे भोगाव्या लागणार आहे, असा आदेश, न्यायाधीश 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख (केळापूर) यांनी दिला. सरकारची बाजू केळापूर न्यायालयाचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी भक्कम पणे मांडली.

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, 26 नोव्हेंबर 2018 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतू मेश्राम यांचे वर गैरजमानती वॉरंटची (NBW) बजावणी करण्यासाठी पोलिस शिपाई राजेंद्र बाजीराव कुडमेथे, पोलिस शिपाई मधुकर मुके व पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद खुपरे शासकीय वाहनाने आरोपीच्या गांवी हिवरी (ता. मारेगांव) येथे गेले. मात्र, येथे आरोपी हा वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करुन पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांच्या डोक्यावर वार करून जागीच ठार केले. फिर्यादी पोलिस शिपाई मधुकर मुके यांनी संबधित घटनेची तक्रार मारेगांव पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन आरोपी अनिल लेतू मेश्राम विरुद्ध मारेगांव पोलिस ठाण्यात अपराध क्रंमाक 399/2018 भादंवि कलम 302, 307, 353, 333, 332 व 324 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मारेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

प्रस्तुत प्रकरणात अभियोजन पक्षाने एकूण 9 साक्षीदार तपासले. अभियोजन पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध केल्याने आरोपी अनिल लेतू मेश्राम यांस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दिपक गावंडे यांनी सहकार्य केले.

मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्…

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

The post पोलिसकाकाचा खून केल्या प्रकरणी हिवरी येथील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka