Dailyhunt
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्.

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : साखरा दरा (ता. वणी) येथील आरोपी खिमेश वंसता जगनाडे (वय 28) यांस भादंवि कलम 354 अ, 452 सह कलम 8 पोक्सो अंतर्गत केळापूर येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ 4000 दंडाची शिक्षा सुनावली.

दंड न भरल्यास आणखी 3 महिण्याची शिक्षा आरोपीला अतिरिक्त भोगावी लागणार आहे. शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली.

या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, 1 डिसेंबर 2014 रोजी दुपारी 5.30 वाजताच्या सुमारास आरोपी खिमेश वसंता जगनाडे हा पीडिता एकटी घरी असतांना घरात घुसला आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडा ओरड केली असता शेतातून तिची आई संगिता ही घरी आली. आरोपीला असे कां केले म्हणून विचारणा केली असता आईला हाता, बुक्याने मारहाण केली व धमकी दिली. सदर घटनेची तक्रार आई संगिता हिने मुकूटबन पोलिस ठाण्यात केली. त्यावरून आरोपी खिमेश वसंता जगनाडे विरुद्ध अपराध क्रमांक 75/2014 अन्वये भादंवि कलम 354 अ, 452, 323, 506 सहकलम 8 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मारोती टोंगे यांनी करुन केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण 7 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचे पुरावे ग्राहय धरण्यात आले. त्यामुळे आरोपी खिमेश वसंता जगनाडे यांस 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व ₹ 4000 दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ₹ 4000 दंडा पैकी ₹ 3000 पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी दिले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस उप निरीक्षक मनोहर कुमरे यांनी काम पाहिले.

Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

राज्य पोलिस दलातील 28 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात…

The post अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka