Dailyhunt
पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू.

पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू.

वी दिल्ली : एका कार चालकाला पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार चालकाने कार न थांबवता थेट अंगावरच गाडी घातली. त्यानंतर कॉन्स्टेबलला १० मीटर पर्यंत फरफटत नेले आणि चिरडून मारले.

या घटनेनंतर आरोपी गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

नांगलोई पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. कारमधील व्यक्तीसोबत पोलिसांचा वाद झाला होता. त्यानंतर कारचालकाने पोलिसाच्या अंगावर कार घातली. कारने फरफटत नेत चिरडण्यात आले. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. संदीप (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव असून ते २०१८ पासून पोलिस सेवेत कार्यरत होते. नांगलोई पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती होती. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगलोई परिसरात वादानंतर कारचालकाने कॉन्स्टेबलला चिरडून मारले. कॉन्स्टेबलने कारचालकाला कार बाजूला घेण्यास सांगितले होते. यामुळे संतापलेल्या कारचालकाने कॉन्स्टेबलच्या अंगावर गाडी घालून चिरडले. कार जप्त करण्यात आली असून, आरोपी फरार आहे. वॅगनआर चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचे दिसले. तेव्हा चालकाला त्याबाबत इशारा देण्यात आला आणि गाडी थांबवायला सांगितले. मात्र त्याने गाडी न थांबवता थेट अंगावर घालून पोलिसाची हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

The post पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka