Dailyhunt
प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप.

प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप.

खनौ (उत्तर प्रदेश): चंदौलीमध्ये सैयदराजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील युवतीने आणि तिच्या प्रियकराने जालियनवाला एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, युवक आणि युवती सोमवारी (ता. ३) दुपारी साधारण 12:15 वाजता ते दोघे हातातहात घालून गप्पा मारत रेल्वे स्टेशनमध्ये आले. त्यानंतर ते चौथ्या फलाटावर गेले. डाउन लाईनवर जालियनवालाबाग एक्सप्रेस येत होती तेव्हा अचानक या दोघांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्या क्षणीच दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

सीओ सदर राजेश राय म्हणाले, 'आम्ही गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू केला आहे. मृत युवती सैयदराजा राजकीय राजकीय कॉलेजमध्ये बी. ए. च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. चार बहिणींमध्ये ती सगळ्यात लहान होती. तिच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. युवकाची ओळख अजून पटलेली नाही, त्यामुळे अधिक माहिती देता येणार नाही. आम्ही पुढील तपास करत आहोत. आमचा प्राथमिक अंदाज असा आहे की, प्रेमसंबंधांमुळे ही घटना घडली असावी.'

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप…

प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

The post प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka