पुणे : पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील कोथरूडच्या आशिष गार्डन समोर तीन जणांकडून युवकावर हल्ला करण्यात आला होता. राहुल जाधव असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले, त्यानंतर राहुल याला पुण्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
राहुल जाधव याच्यावर हल्ला करणारे चारही आरोपी अल्पवयीन आहेत. या चारही अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृत युवकाचे आरोपींच्या पैकी एकाच्या आईसोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधांच्या संशयावरुन सर्व आरोपींनी राहुलला जीवे मारण्याचा निर्णय घेतला. कोथरूड परिसरामध्ये संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास राहुल सागर कॉलनीमध्ये दुचाकीवरून जात होता, तेव्हाच आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की राहुलला यात जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…
पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…
धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…
पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…
The post पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

