Dailyhunt
प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!

प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

प्रियांका निकम या गेल्या तीन वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरातील विश्रामबाग पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करंदी हे त्यांचे गाव. लहानपणापासून अंगावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी. मुलाच्या जन्मानंतर कोणताही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश. गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या यशस्वी वाटचाली विषयी थोडक्यात…

प्रियांका निकम यांचा प्रेरणादायी प्रवास हा एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी ठरेल. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अक्षरशः यश खेचून आणले आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला काही करून पोलिस अधिकारी व्हायचेच, हा ध्यास त्यांनी घेतला होता. आई म्हणून एक वर्षाच्या बाळाची जबाबदारी पार पाडत असताना रात्रीचा दिवस करून त्यांनी घरच्या घरी अभ्यास केला. एमपीएससीचा फॉर्म भरायला सुद्धा जवळ पैसे नसताना त्यांनी जिद्द बाळगली आणि पोलिस अधिकारी होऊन दाखवले आहे. खरोखरच त्यांच्या जिद्दीला सलाम!

बालपण…
प्रियांका निकम यांचे करंदी हे गाव. निसर्गाच्या सान्निध्यात, पण वाहतुकीची फारशी सुविधा नसलेले खेडेगाव. वडील शिक्षक तर आई गृहिणी. चार भावंडांमध्ये त्या मोठ्या. दोन बहिणी तर एक भाऊ. दोन आज्या. आई आजारी असल्यामुळे अगदी चौथीत असल्यापासूनच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. चौथीमध्ये असल्यापासून त्या स्वयंपाक करत. शिवाय, भावंडाची जबाबदारी पेलत. शिक्षण, घर आणि शेतीमध्ये काम करत करतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. लहानपणापासून कष्ट करण्याची लागलेली सवय त्यांना एमपीएससीचा अभ्यास करताना नक्कीच फायद्याची ठरली.

शिक्षण…
प्रियांका निकम यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे करंदी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. गाव छोटे असल्यामुळे आणि गावामध्ये पुढील शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे त्यांना पाचवड येथे पुढील शिक्षणासाठी जावे लागले. करंदी ते पाचवड असा प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. एकदा एसटी बस चुकली तर चार कि.मी. चालत जावे लागायचे. पावसाळ्यात तर गुडघाभर पाण्यातून कासरा टाकून त्यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत होती. १२ वी पर्यंतचे शिक्षण पाचवड येथे झाल्यानंतर कोल्हापूर विद्यापीठामधून त्यांनी बीएची पदवी प्राप्त केली.

कुटुंबाची जबाबदारी…
प्रियांका निकम यांच्यावर अगदी लहानपणापासूनच कुटुंबाची जबाबदारी अंगवार पडली होती. लहानपणापासूनच कुटुंबातील आठ जणांचा स्वयंपाक करावा लागे. आईच्या आजारपणामुळे भावंडाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्या काम करताना दिसत. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सकाळी कॉलेज केल्यानंतर दुपारनंतर शेतीची कामे करावी लागत. रात्री पुन्हा स्वयंपाक. यामुळे संपूर्ण दिवस कामामध्येच व्यस्त असायचा.

विवाह…
लहानपणापासून घर आणि काम यामध्येच वेळ कसा गेला समजलेच नाही. पुढे विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांमध्येच सातारा येथे राहायला यावे लागले. भाड्याची खोली. सासरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. २०१६ मध्ये मुलाचा जन्म झाला. कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मोठी ओढाताण होत होती. मुलाच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार डोक्यात आल्यानंतर काही तरी करायला हवे, असे वाटायचे. पण, काय करावे? सातारा येथे आल्यापासून घरामध्ये लहान मुलगा, पती आणि त्या स्वतः. यामुळे चिमुकल्याची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर होती. मुलाचा सांभाळ करत असताना वेळ कसा निघून जाई हे कळतही नव्हते. दुसरीकडे आर्थिक ओढाताण तर होतीच. काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते.

मित्र-मैत्रीणीची मोलाची मदत…
प्रियांका निकम यांनी विवाहापूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये स्पर्धा परीक्षा दिली होती. पण, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते. विवाहानंतर आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा विचारही डोक्यात आला नव्हता. पण, आर्थिक परिस्थिती आणि मुलाच्या भवितव्याचा विचार करून मैत्रीण अंकिता वाघ आणि नवनाथ ढवळे मदतीला धावून आले. दोघेही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सेलटॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. प्रियांका यांना दोघांनी स्पर्धा परीक्षा द्यावी, असा मोलाचा सल्ला दिला. प्रियांका यांनी मित्रांच्या सल्ल्यानंतर पुन्हा एकदा अभ्यास करायचे ठरवले.

मैत्रिणीनेच भरला फॉर्म…
प्रियांका निकम यांना मैत्रीण अंकिता वाघ आणि नवनाथ ढवळे यांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली. कारण, नवीन पुस्तके घेण्यासारखी परिस्थितीच नव्हती. चिमुकला झोपला की मन लावून अभ्यास करत. रात्रीचा दिवस करून अभ्यास सुरू ठेवला होता. मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जिद्दीने अभ्यास करत. रात्री आणि पहाटे अभ्यास केल्याचा पुढे त्यांना मोठा फायदा झाला. स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा जवळ पाचशे रुपये नव्हते. मैत्रीण अंकिता वाघ यांनीच फॉर्म भरला होता. एमपीएससीचा कोणताही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून परीक्षा दिली होती. काही करून यश मिळवायचेच, ही जिद्द होती.

एमपीएससी पास झाल्याचा फोन आला अन्…
२०१६ मध्ये मुलाचा जन्म आणि स्पर्धा परीक्षा दिली होती. एकाच वेळी दोन मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या. स्पर्धा परीक्षेतील यशाची खात्री होती. पण….

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka