(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत हे पोलिस दलात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात प्रशासकीय कामात त्यांनी मोठे काम केले असून, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
शशिकांत सावंत यांचे मूळ गाव सातारा. वडील मुंबई पोलिस दलात असल्यामुळे बालपण मुंबईतच गेले. पण, अचानक वडिलांची नोकरी गेल्यामुळे पुढे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकंटाना सामोरे जावे लागले. आईचे लहानपणापासूनचे संस्कार आणि खडतर आयुष्य खूप काही शिकवून गेले. रस्त्यावर भाजी विकून मिळवेलेले चार पैसे आयुष्यभर आर्थिक नियोजनात महत्त्वाचे ठरले. शाळेत हुशार असल्यामुळे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. पण, काही कारणामुळे स्वप्न हे स्वप्नच राहिले. खडतर प्रवासातून ते पोलिस दलात दाखल झाले आणि प्रशासकीय कामात त्यांनी ठसा उमटवला.
वडील पोलिस खात्यात…
शशिकांत सावंत यांचे वडील पोलिस खात्यात कार्यरत होते. पण, १९८१ साली झालेल्या बंडामुळे अनेक पोलिसांना नोकरीमधून बडतर्फ करण्यात आले. यामध्ये श्री. सावंत यांचाही समावेश होता. सर्वसामान्य कुटुंब आणि अचानक वडिलांची नोकरी गेल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली. कुटुंबात आई-वडील आणि चार भावंडे. वडिलांची नोकरी गेल्यानंतर सर्व जण आजोबांकडे राहायला गेले. पुढे काही दिवस आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
भाजी विक्री…
कुटुंबामध्ये सहा जण आणि कमावणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेल्यामुळे आर्थिक नियोजन बिघडले होते. आईने घर सांभाळून विविध नोकऱ्या करून कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी हातभार लावला. मोठ्या भावाला शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली. त्यांच्यामुळेच आम्हा इतर भावंडांना पुढील शिक्षण घेता आले. शिक्षणासाठी पैसे मिळविण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करून चार पैसे मिळवले आणि शिक्षण पूर्ण केले. पण, त्या कालावधीमध्ये खूप काही शिकायला मिळाले. आयुष्यभर त्याचा फायदाच झाला. परिस्थिती खूप काही शिकवत असते, असे म्हणतात ना अगदी तसेच त्यांच्याबाबतही झाले. लोअर परळ भागात राहत होते. १९८०-९०चा काळ म्हणजे गँगवारचा होता. वयात येणारी अनेक मुलं गँगवारकडे ओढली जात होती. पण, आईच्या शिस्तीमुळे आणि आदरयुक्त भीतीमुळे चारही भावंडावर चांगले संस्कार झाले.
इंजिनिअरिंगला नंबर अन् भूकंप…
शशिकांत सावंत हे पहिल्यापासून अभ्यासात हुशार होते. दहावीला चांगले गुण मिळाले होते. इंजिनिअरिंग करण्याचा त्यांचा मानस होता. १९९२ साली चांगल्या गुणांच्या जोरावर इंजिनिअरिंगसाठी त्यांचा उस्मानाबाद येथे नंबर लागला होता. पण, त्याच वर्षी लातूरला मोठा भूकंप झाला होता. या भूकंपात अनेकांना जीव गमवावा लागला होता. पुढील काही दिवस त्या भागात भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे कुटुंबासह नातेवाइकांनी त्यांना उस्मानाबादला (धाराशिव) जाण्यापासून रोखले आणि इंजिनिअरिंगचे स्वप्न अपुरे राहिले. पुढे एक वर्षे वाया गेले. पण, त्या कालावधीमध्ये छोटी नोकरी केली.
पोलिस भरती…
वडील पोलिस दलात असल्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाने दोघांचाही पोलिस पाल्य म्हणून दाखला काढला होता. दरम्यानच्या काळात पोलिस भरती निघाली. वडिलांच्या मित्रांनी पोलिसमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. पोलिस भरतीसाठी कोणत्याही प्रकारे अभ्यास केला नव्हता. केंद्रावर जाऊन अचानक परीक्षा दिली आणि निकाल हाती आल्यानंतर धक्का बसला. कारण, १०० पैकी ८० गुण मिळाले होते. पोलिस भरतीसाठी १६ नोव्हेंबर १९९४ रोजी नियुक्तीपत्र आल्यानंतर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. एक वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर १९९५ साली पोलिस शिपाई म्हणून ते मुंबई पोलिस दलात दाखल झाले.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

