Dailyhunt
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्.

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्.

पुणे : प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबावर बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.

आरोपी भोंदूबाबा भक्तांच्या मोबाइलमध्ये 'हिडन ॲप' डाऊनलोड करून त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत असे. याशिवाय, तो भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करत होता. याबाबतची धक्कादायक माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. भोंदूबाबा एका कागदावर भक्ताच्या मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत असे, की त्या दिवशी तू मरशील! त्यामुळे अनेक भक्त मानसिक दबावाखाली त्याच्या सांगण्यानुसार वागत होते.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

आरोपी भोंदूबाबाच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी (ता.१) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्डसह अस्वस्थता आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट देखील जप्त करण्यात आले आहे. 'आरोपीने भक्तांचे खासगी क्षण 'हिडन ॲप'द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती समोर आली आहे. स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का, यासह विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी,' अशी मागणी तपास अधिकारी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

आरोपी भोंदूबाबाने भक्ताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठं संकट येणार असल्याची भीती दाखवून त्याच्या मोबाइलमध्ये 'हिडन ॲप' डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्याला पाण्यातून गुंगीची गोळी देऊन अनैसर्गिक अत्याचार केले. दुसऱ्या भक्ताला गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करताना दोष स्वत:वर घेत असल्याची बतावणी देखील केली. आणखी एकाला त्याचे दोष दूर करण्यासाठी 'हिडन ॲप' सुरू ठेवून मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. आरोपीच्या चाळ्यांना एका भक्ताने विरोध केला असता, 'तू उपाय अर्धवट सोडून चालला आहे,' असे सांगून एका कागदावर तारीख लिहून त्या तारखेला मृत्यू होईल, अशी भीती घातल्याचे भक्तांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

The post पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka