Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी; फरार आरोपी जेरबंद.

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी; फरार आरोपी जेरबंद.

पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत चार वर्षांपासून चार गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले आहे. शिवाय, जबरी चोरीचा गुन्हा आणला उघडकीस आणला आहे.

वालचंदनगर पोलिस स्टेशन गु.र.नं. २६/ २०२४ भा. न्या. सं. ३९४ प्रमाणे दि. १७/०९/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी दिपक पोपट रासकर (वय ३२ वर्षे रा. निरवांगी ता. इंदापूर जि. पुणे) हे त्यांचे आईसह राहते घरात झोपलेले असताना १७/०१/२०२४ रोजी पहाटेच्या वेळी अनोळखी दोन व्यक्तींनी घरात घुसून चोरी करत असताना फिर्यादीस जाग आल्याने चोरटयांना विरोध केल्यामुळे फिर्यादीस चाकूने मारहाण करून जबरी चोरी केली आहे. त्याबाबत फिर्यादीने वरील प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा. चे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकास सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, आसपासचे परिसरात साक्षीदारांकडे तपास करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे स्था.गु.शा. चे पथकाने घटनास्थळा पासून जाणारे येणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, काही संशयित निदर्शनास आले होते. सदर फुटेज मधील व्यक्तींचे वर्णन व गुन्हा करणेसाठी आलेले आरोपींचे वर्णनात साम्य होते, त्याअनुषंगाने पथकाने प्राप्त फुटेज हे गोपनीय बातमीदारांना दाखविले असता, संशयित व्यक्ती हा रेकॉर्डवरील आरोपी शिवा मिठु भोसले (रा. पिटकेश्वर इंदापूर) हा असून त्यानेच त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या माहितीचे आधारे निष्पन्न आरोपी शिवा भोसले याचा स्था.गु.शा. चे पथकाने वारंवार जावून शोध घेतला असता, तो वेळोवेळी गुंगारा देत होता.

स्था.गु.शा. चे पथक १५/०२/२०२५ रोजी वालचंदनगर पो स्टे हद्दीत गुन्हे प्रकटीकरणाचे अनुषंगाने हजर असताना पोहवा स्वप्निल अहीवळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी शिवा भोसले आहे सराफवाडील चौकात आलेला आहे, अशी बातमी मिळाल्याने पथकाने सापळा रचून आरोपी शिवा मिठु भोसले (वय ४५ वर्षे रा. पिटकेश्वर, भोंगवस्ती, ता. इंदापूर जि. पुणे) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने वरील नमुद गुन्हा केला असल्याचे सांगितले असून त्याचे सोबत गुन्हा करते वेळी त्याचे सोबत इतर साथीदार असल्याचे सांगितले.
(१) वालचंदनगर पो स्टे गु.र.नं. ६१२ /२०२३ भादंवि ४५७, ३८०, (२) इंदापूर पो स्टे गु.र.नं ७६ / २०२२ भादंविक, ३२५,
(३) इंदापूर पोस्टे गु.र.नं.५०३/२०२३ भादंवि क. ४५४, ४५७,३८० (४) इंदापूर पो स्टे गु.र.नं ८८१ / २०२३ भादंविक.
४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपी शिवा मिठु भोसले वय ४५ वर्षे रा. पिटकेश्वर, भोंगवस्ती, ता. इंदापूर जि. पुणे हा पाहिजे आरोपी असून तो पुणे ग्रामीण जिल्हयाचे अभिलेखावर पाहिजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पो स्टे चे सपोनि राजकुमार डुणगे, स्था. गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा. चे अंमलदार बाळासाहेब कारंडे, ज्ञानदेव क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, अतुल डेरे, यांनी केली आहे.

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

The post पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी; फरार आरोपी जेरबंद… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka