Dailyhunt
पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू.

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये आज (गुरुवार) सकाळी पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली एक पाण्याची टाकी कोसळली. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोप नागरिकांनी केला आहे. आज सकाळी साधारण ७ च्या दरम्यान ही पाण्याची टाकी कोसळून ही दुर्घटना घडली.

पाण्याच्या टाकीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यामुळे पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ढिगारा हटवून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले

हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…

मनोधैर्य योजना! 'बोपदेव घाट' प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…

The post पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka