Dailyhunt
पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त.

पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त.

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी (ता. ११) रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. देहूरोड परिसरात एका फॉर्च्युनर गाडीत 3 लाख 20 हजार रुपये आढळून आले. विवेक काळोखे आणि सागर बसे हे दोघे पैसे वाटप करायला आलेत, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती.

त्यानुसार पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केल्यावर ही रोख रक्कम आढळली. मात्र गाडीत कोणत्याच पक्षाशी संबंधित चिन्ह अथवा वस्तू आढलेल्या नाहीत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

काळोखे आणि बसे दोघे ही बांधकाम व्यावसायिक आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे या दोघांना समजपत्र देऊन, ही रक्कम शासनाकडे जमा करून घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. रविवारी सुद्धा सचिन मुर्हे या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यलयात 36 लाख 90 हजारांची रोकड आढळली, त्यानंतर घरी जाऊन तपासणी करण्यात आली. तर घरी सुद्धा 15 लाखांची रोकड सापडली होती.

मावळ विधानसभेत पैशांचे वाटप होत असल्याचे आरोप होत आहेत, तक्रारींची शहानिशा केल्यावर दोन ठिकाणी रोकड ही आढळल्याने खळबळ उडालेली आहे. तपासणीत कोणत्या ही पक्षाशी संबंधित वस्तू आढळले नसल्याने ही रोकड नेमकी कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाही. गेल्या काही दिवसांपुर्वी मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने कारमधून 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कारचालक पियुष जखोडीया (वय 34) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मावळमध्ये शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कारमध्ये रोकड सापडली. चालकाकडे चौकशी केल्यानंतर कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगण्यात आले. तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केल्याचे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…

पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…

पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची…

मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…

भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या…

The post पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka