Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात जबरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

पुणे शहरात जबरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात जबरी चोरीसह दुखापत करणारा पाहिजे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

कक्ष ६ हद्दीमध्ये स.पो. नि. कांबळे, पो.ना.

मुंढे ,पो.हवा. सकटे व कारखिले असे निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यांना माहिती मिळाली कि, हांडेवाडी रोड या ठिकाणी जुलै, २०२४, मध्ये ४ जणांनी एका रिक्षाचालकास जबर मारहाण करून त्याच्याजवळची रोख रक्कम जबरीने घेऊन गेले आहेत. कोंढवा पो.ठाणे येथे गु.र. नं. 824 /2024, 309 (6), 3 (5) याप्रमाणे गुन्हा नोंद आहे आणि नमुद गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी मोहित रवी शेलार (वय 19 वर्ष रा. श्रीराम चौक, हडपसर, पुणे) हा साई मंदिर चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे उभा आहे.

पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन वर नमूद आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यापासून नमूद आरोपी हा फरार होता. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोंढवा पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक…

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने केले गजाआड…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

मनोधैर्य योजना! 'बोपदेव घाट' प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…

The post पुणे शहरात जबरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka