Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयााबाबत मोठी माहिती समोर.

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयााबाबत मोठी माहिती समोर.

पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रशासनामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये संताप पसरला असून, आंदोलने केली आहेत. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. शिवाय, रुग्णालयाने 27 कोटी रुपयांचा कर थकवला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही असे लिहून दिले आहे. परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेतला आहे. तर सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेच काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून ते आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. या योजनेत, रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या गंभीर आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य सेवा दिली जाते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही महाराष्ट्र सरकारची आरोग्य योजना आहे, ज्याचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी आरोग्य सेवा देणे हा आहे. 2 जुलै 2012 रोजी ही योजना सुरू झालेली आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना व्यापक वैद्यकीय सहाय्य देते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित गटांना आवश्यक आरोग्यसेवा कव्हर प्रदान करते. पात्रतेमध्ये पिवळे, अंत्योदय अन्न योजना (AAY), अन्नपूर्णा किंवा केशरी रेशन कार्ड (श्रेणी A) असलेले कुटुंबे; पांढरे रेशन कार्ड (श्रेणी B) असलेले १४ संकटग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी; आणि अनाथाश्रमातील मुले, महिला कैदी आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार (श्रेणी C) असे विविध लाभार्थी समाविष्ट आहेत.

शिवाय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याचे समोर आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षात एकही रुपयाचा कर भरला नसल्याची माहिती पुढे आले आहे. त्यामुळे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकत कर रुग्णालय प्रशासनाने थकविल्याचे समोर आले आहे. रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019-20 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने महापालिकेचा गेल्या सहा वर्षांपासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांच कर थकवला आहे. एकीकडे धर्मदाय रुग्णालयांना मिळकतकर सवलत असल्याचा दावा केला जात असला, तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनकडे 27 कोटींची थकबाकी दाखविली आहे.

 tanisha-bhise-pune

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले…

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण…

पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू…

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka