Dailyhunt
पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास.

पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास.

पुणे : पुणे शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतला आहे. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. गुंजाळ हे खडकी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते, मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. दरम्यान, आज (शुक्रवार) त्यांचा शोध लागला असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचे कारण असू शकेल. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पाँईटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

The post पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka