हैदराबाद : सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा 2 : द रुल हा चित्रपट रिलीज झाल्यापासून जोरदार कलेक्शन करत असून, दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक झाली आहे. पुष्पा 2 च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि अल्लू अर्जुन- रश्मिका मंदान्ना यांची एक झलक पाहण्यासाठी प्रंचड गर्दी झाली होती. अचानक चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. याच महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुष्पा-2 हिरो अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत रेवती (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा 13 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. शिवाय, गुदमरल्याने अनेक लोक बेशुद्ध झाले होते.
महिलेच्या मृत्यूनतर कुटुंबीयांनी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 105 आणि 118 (1) आणि कलम 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट्रल झोनचे डीसीपी अक्षांश यादव यांनी सांगितले की, तक्रारीनुसार या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन, थिएटर व्यवस्थापन आणि त्याच्या सुरक्षा टीमला आरोपी करण्यात आले आहे. त्या रात्री त्यांच्या सुरक्षा दलात कोण उपस्थित होते आणि लोकांना धक्काबुक्की कोणी केली, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली हे शोधून काढावे लागेल? आम्ही तिथे तैनात होतो आणि पोलिसांची कोणतीही चूक झाली नाही. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…
अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…
बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…
अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…
The post पुष्पा 2! सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

