भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूरचे राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बेपत्ता झाले होते. या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयमधील एका दरीत 2 जून 2025 रोजी सापडला होता.
बेपत्ता असलेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. त्यावेळी तिने हत्येची कबुली दिली.
शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमने यूपीतील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रात्री उशिरा झालेल्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. या घटनेमागील नेमकं कारण आणि सोनम उत्तर प्रदेशात कशी पोहोचली, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
सोनम बेपत्ता झाल्यानंतर सोनमचा भाऊ सध्या शिलाँगमध्येच आहे. सोनमला शोधणाऱ्या टीमसोबतच तो आहे. सोनम आणि राजाला शेवटचे हॉटेलमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही समोर आले आहे. यामध्ये त्यांनी अॅक्टिव्हा भाड्याने घेतली. तिथे त्यांचे शेवटचे लोकेशन देखील ट्रेस करण्यात आले होते. पोलिसांना 21 मे चे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यात हे जोडपे शिलॉंगमधील एका वेगळ्या होमस्टेमध्ये चेक इन करताना दिसत आहे. 4 मिनिटे आणि 53 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, राजा आणि सोनम दोघेही काळ्या जॅकेटमध्ये, एका पांढऱ्या सुटकेससह होमस्टेमध्ये पोहोचलेले दिसत आहेत.
दरम्यान, इंदौरचे राजा रघुवंशी आणि त्यांती पत्नी सोनम रघुवंसी यांचा विवाह 11 मे रोजी झाला. विवाहानंतर 20 मे रोजी ते हनीमूनला शिलाँगला गेले. कुटुंबाशी त्यांचे शेवटचे बोलणे 23 मे च्या दुपारी झाले होते, त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. कोणताही संपर्क होत नसल्याने राजा आणि सोनमचा भाऊ इंदौरहून शिलाँगला रवाना झाला. तिथे तपास करताना 2 जून रोजी राजाचा मृतदेह आढळून आला, तर सोनम बेपत्ता झाली होती. सोनम हिने सुपारी देऊन हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…
हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…
The post राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

