Dailyhunt
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम.

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम.

खनौ (उत्तर प्रदेश): दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह ठरला होता. विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरीने दाढी काढण्यास सांगितले होते.

पण, नवऱ्याने दाढी न काढल्यामुळे महिलेने दिरासोबत पळ काढल्याची घटना मेरठमध्ये घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मेरठमधील उज्जवल गार्डन कॉलनीत राहणाऱ्या मौलाना शाकिर यांच्या पत्नीला त्यांची दाढी आवडत नव्हती. हनिमूनच्या रात्रीपासूनच ती सतत त्यांना दाढी काढण्याचा आग्रह करत होती. मात्र, शाकिरने दाढी काढण्यास नकार दिला, कारण ती त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्याने पत्नीला समजवून सांगितले होते. पण पत्नीने काही ऐकले नाही. दोघांमध्ये वाद होत होते.

दररोजच्या भांडणांना कंटाळून महिलेने दाढी नसलेल्या दिरासोबत घरातून पळ काढला आहे. या प्रकरणी शाकिरने लिसाडी गेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, टपत्नी आता त्याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत आहे. पत्नी आणि भाऊ दोघेही पळून गेले आहेत.’ दरम्यान, या विचित्र घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दाढी आवडली नाही म्हणून पत्नी दिरासोबत पळून गेली आणि आता पैशांची मागणी करत आहे, हे ऐकून नागरिकांना धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…

हनिमूनच्या रात्री पत्नीने गरोदर असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…

हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…

हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

The post हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka