Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही.

हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही.

खनौ (उत्तर प्रदेश): कुशीनगरमधील युवकाचं मोठ्या उत्साहात लग्न झालं.पण, हनिमूनच्या रात्री त्याच्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत सांगताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अन् त्याला धक्का बसला.

नवरी हनिमूनच्या रात्री म्हणाली, ‘माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझा बॉयफ्रेंड आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं, पण माझं माझ्या बॉयफ्रेंडवरच प्रेम आहे. त्यामुळे मला हात लावायचा नाही.’ हे ऐकल्यानंतर नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. दुसऱ्या दिवशी सकाळीच वराने ही गोष्ट त्याने त्याच्या कुटुंबियांना सांगितली. यानंतर वधूच्या पालकांनाही बोलावण्यात आले. खूप गोंधळ झाला, पण वधू तिच्या हट्टावर ठाम राहिली. मग चौथ्या दिवशी ती अचानक घरातून पळून गेली. पण गावकऱ्यांनी तिला थांबवले आणि तिच्या सासरच्यांकडे स्वाधीन केले. पालकांना पुन्हा बोलावण्यात आले. अखेर पंचायत बोलावण्यात आली. शेवटी लग्नाच्या 5व्या दिवसानंतरच नवऱ्याने त्याच्या बायकोचे लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिले.

7 मे रोजी तमकुहिराज पोलीस स्टेशन हद्दीतील गाझीपूर येथील रहिवासी मुन्ना राजभर यांचा मुलगा ब्रजेश राजभर याचा विवाह रामदास बागी पोलीस स्टेशन कटेया जिल्हा गोपालगंज बिहार येथील दिलीप भर यांची मुलगी कोशिला कुमारी हिच्याशी झाला होता. लग्नाच्या रात्री पत्नीने तिच्या पतीला तिच्या प्रियकराबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. वधूला समजावून सांगण्यात आले. त्यानंतर नवरी चार दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली, परंतु पाचव्या दिवशी घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. नवविवाहित महिलेला अशा प्रकारे घरातून एकटी बाहेर पडताना पाहून गावकऱ्यांना संशय आला. तिला ताबडतोब थांबवण्यात आले आणि तिच्या सासरच्यांना कळवण्यात आले. काही वेळाने, सासरचे लोक आले आणि नवविवाहित वधूला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले मी माझ्या प्रियकरासोबतच राहील, असे नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्यांनाही स्पष्टपणे सांगितले.

सासरच्यांनी नवविवाहित वधूच्या पालकांना याबद्दल माहिती दिली. यानंतर तिचे पालक आणि इतर लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला पण नवविवाहित महिलेने लग्नाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मला प्रियकरासोबतच आयुष्य जगायचं आहे, विनंती करू लागली. खूप प्रयत्न करूनही नवविवाहित वधूने कोणाचंही ऐकण्यास नकार दिला. दोन्ही पक्षांचे लोक तामकुहीराज तहसीलमध्ये पोहोचले आणि त्यांनी प्रियकराचे मत विचारण्यासाठी त्याला घटनास्थळी बोलावले. प्रियकराने तिला आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. नवरदेवाने एक शपथपत्र तयार करून घेतले आणि लग्न झाल्याच्या पाचव्या दिवशीच आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवून दिले. या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…

हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…

हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…

हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka