Dailyhunt
संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे.

संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे.

ठाणे : घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित युवती डायघर जवळील शीळ फाटा येथील मंदिरात गेली होती. मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा प्यायला नंतर युवतीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ती मंदिरातच राहिली.

दरम्यान, या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देली. पोलिसांनी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…

विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…

धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार…

शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय…

The post संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka