Dailyhunt
संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्.

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्.

खनौ (उत्तर प्रदेशः : एकाने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर आपल्या पाच मित्रांना घरी बोलवले आणि त्यांच्यासोबत दारू प्यायला. यानंतर त्याच्या पाचही मित्रांनी त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रायबरेलीमध्ये घडली आहे.

यानंतर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळण्यात आले आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चुरुवा गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितू सिंह याचा प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील एका युवतीसोबत झाला होता. जितू सिंहने शनिवारी आपल्या पाच मित्रांना घरी बोलावले होते. प्रथम त्यांनी एकत्र बसून दारू प्यायली, त्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. प्रकरण लपवण्यासाठी त्यांनी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

जितू सिंहने पत्नीवर आपल्याच पाच साथीदारांनी सामूहिक बलात्कार करायला सांगितल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीओ महाराजगंज यदुराम पाल यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी जितू हा चुरवा येथील रहिवासी असून त्याने उत्तराखंडमधील एका मुलीशी लग्न केले होते. पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून जितूला अटक करण्यात आली आहे. इतर दोषींवर कारवाई केली जाईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सहा जणांकडून बलात्कार…

The post संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka