रांची (झारखंड) : एका 14 वर्षांच्या मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना धनबाद जिल्ह्यात घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
रांचीपासून 160 किलोमीटर अंतरावरच्या धनसार पोलिस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडितेने जबाबात सांगितले की, ‘माझ्या प्रियकराने मला रविवारी सायंकाळी घरी बोलवले होतं. मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिथं त्याचे काही मित्रदेखील उपस्थित होते. त्यांनी मला एका खोलीत बंद करून ठेवले. त्यानंतर माझ्यावर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशीदेखील त्याच्या इतर मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला. शिवाय, व्हिडिओ बनवला आहे.’
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'पीडित मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाले होते. पोलिसांनी जेव्हा मुख्य आरोपीच्या घरावर छापा टाकला तेव्हा तिथे कोणीच सापडले नाही. आरोपींनी केवळ मुलीवर बलात्कारच केला नाही, तर आरोपींपैकी एकाने मोबाइल फोनवर या घटनेचा व्हिडिओ बनवला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन जप्त केला आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच आरोपींना पकडण्यासाठी छापेदेखील टाकले जात आहेत, अशी माहिती धनसार पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज पांडे यांनी दिली.
धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार…
धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…
धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या…
धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार…
The post धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सहा जणांकडून बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

