नागपूर : विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना काटोल येथे घडली आहे. विजय धवड (वय ५७) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला होता.
काटोल तालुक्यातल्या कोंढळी परिसरातल्या वाई शाळेत विजय धवड हे मुख्याध्यापक होते. शाळेत शिकवत असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. विजय धवड यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
विजय धवड हे नेहमीप्रमाणे वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यांच्या अचानक छातीत दुखायला लागले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. शाळेतील इतर शिक्षकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. शिक्षक विजय धवड यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. एक आदर्श शिक्षक गमावल्याचे अनेकांनी सांगितले.
नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…
नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…
The post शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच ‘आदर्श शिक्षका’ने घेतला अखेरचा श्वास… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

