सोलापूरः दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रपोज करत मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत मानसिक त्रास दिला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक तिचा सतत पाठलाग करत होता.
सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादवरून शिक्षकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन’, अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादमध्ये म्हटले आहे. शिक्षकाने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रपोज केले होते. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत पाठलाग करत होता.
दरम्यान, जानेवारी 2024 मध्ये हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351 (2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…
शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्…
धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…
मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…
ठाणे हादरले! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण अन् रेकॉर्डिंग…
The post शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

