Dailyhunt
ठाणे हादरले! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण अन् रेकॉर्डिंग.

ठाणे हादरले! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण अन् रेकॉर्डिंग.

ठाणे: अंबरनाथ शहरातील पश्चिम भागात असलेल्या एका खाजगी शाळेतील शिक्षकाने शाळेतील तीन अल्पवीयन विद्यार्थ्यांचे लैगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लैगिंक शोषणाचे मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलांचे वारंवार लैगिंक शोषण करत असल्याचेही समोर आले.

याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला बेडया ठोकल्या आहेत. जेम्स जोसेफ शेराव असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत गरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एका सामाजिक संस्थेमार्फत ही शाळा सुरू आहे. या शाळेत जेम्स शिक्षक आहे. गेल्या काही महिन्यापासून संबंधित शिक्षक शाळेतील 14 ते 7 वर्षीय अल्पवीयन विद्यार्थ्यांकडून शाळेतच वर्गामध्ये अंगावरील कपडे काढून मालिश तेल करून घेत त्यांचे लैगिक शोषण करीत होता.

शिक्षकाकडून वारंवार लैंगिक छळ होत असल्याने पीडित मुलांनी शाळेत जाणे बंद केले होते. मुलं शाळेत का येत नाही म्हणून शाळा संचालकाने त्या मुलांच्या घरी जाऊन चौकशी असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षक उघड्या अंगावर पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह पोस्को कायदयानुसार गुन्हा दाखल करत शिक्षकाला काही तासातच अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…

शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्…

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच 'आदर्श शिक्षका'ने घेतला अखेरचा श्वास…

पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…

संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…

The post ठाणे हादरले! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण अन् रेकॉर्डिंग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka