Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका.

शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका.

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहराच्या जोशीवाडी येथून एका १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून, बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका करण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे.

त्यामुळे शिरूर पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

जोशी वाडी (ता. शिरूर) येथून गुरूवारी (ता. १३) सकाळी ८ ते १ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला. शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने जलद हालचाल करत आरोपीला मुंबई येथे जाऊन ताब्यात घेतले आणि अपहरण झालेल्या बालिकेची सुखरूप सुटका केली. या कारवाईत शिरूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, महिला पोलिस अंमलदार गीता सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

शिरूर पोलिसांनी या प्रकरणात वेगवान आणि अचूक तपास करत तत्काळ आरोपीला अटक केली व अल्पवयीन बालिकेला सुरक्षितपणे आपल्या नातेवाईकांकडे सुपुर्त केले. शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या या कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून व वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.

पोलिस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे यांचे विषेश कौतुक…
चिमुकलीचे अपहरण झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून तातडीने शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र तपास करत शिरूर शहरापासून मुंबई पर्यंत शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण करूण आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा…

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka