Dailyhunt
स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे.

स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे.

मुंबई : वरळीत स्पामध्ये एकाची हत्या करण्यात आली होती, हत्येचे कारण समोर आले आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

खुनाच्या घटनेत आरोपीबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे हत्या झालेल्या गुरूच्या शरीरावर २२ जणांच्या नावाचा टॅटू होता. वाघमारे याने त्याच्या शत्रुंची नावे दोन्ही पायांवर टॅटूने लिहिली होती. यात गुरुच्या हत्येची सुपारी देणाऱ्याचेही नाव होते.

गुरु वाघमारे हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता. त्याची हत्या स्पाच्या मालकानेच केली. स्पा विरोधातल्या तक्रारी आणि खंडणीच्या त्रासाला कंटाळून मालकानेच त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. शेरेकर यांचा वरळीतील सॉफ्ट टच स्पा आणि नालासोपाऱ्यातील आरोपी फिरोजचा स्पा गुरु वाघमारेच्या तक्रारीमुळे बंद झाला होता. त्यामुळे गुरुच्या हत्येची सुपारी दिली होती.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

स्पा मर्डर केसचा खुलासा टॅटूवरून झाला आहे. गुरु वाघमारे याच्या शरीरावर मिळालेल्या टॅटूवरून गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा छडा लावला. मृत्यू झालेल्या गुरु सिद्धप्पा वाघमारे याने गजनी चित्रपटातील आमिर खान प्रमाणे शरिरावर त्याच्या शत्रुंची नावे टॅटूने लिहिली होती. या नावांच्या यादीतील एका नावावरून पोलिसांनी हत्या प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी स्पाच्या मालकासह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुरूने टॅटूने ज्यांची नावे लिहिली होती त्यात स्पाच्या मालकाचेही नाव होते जिथे गुरुची हत्या झाली होती. स्पाच्या मालकाने पोलिसांना गुरुच्या हत्येची माहिती खूप उशिरा दिली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे स्पा मालक संतोष शेरेकर यांची चौकशी केल्यानंतर सर्व उलगडा झाला.

सुपारी घेऊन हत्या केल्याचा हा प्रकार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वाघमारेच्या मारेकऱ्याचाही समावेश आहे. वाघमारेच्या वाढदिवसानिमित्त 17 जुलै रोजी त्याची हत्या करण्याचा प्लॅन होता, मात्र तो प्लान यशस्वी झाला नाही. दरम्यान, मुंबईतील वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पामध्ये गुरु वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला. त्याचा गळा चिरला होता. त्यांच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, यामध्ये वाघमारेला संपवण्यासाठी सहा लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पाला नियमित भेट देत असे आणि तेथे काम करणाऱ्यांशी त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच वाघमारेचा वाढदिवस होता. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तो स्पामध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या 21 वर्षीय कथित गर्लफ्रेंडने आणि इतर तीन पुरुष मित्रांनी वाघमारेला पार्टीसाठी विचारले. यानंतर हे पाचही जण सायन स्थानकाजवळील अपर्णा बारमध्ये गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास ते सर्वजण स्पामध्ये पार्टीहून परतले. काही वेळाने तिघेही तेथून निघून गेले तर वाघमारे व त्याची मैत्रीण मागे राहिले. सुमारे दोन तासानंतर मोहम्मद अन्सारी आणि साकीब अन्सारी यांनी स्पामध्ये घुसून वाघमारे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व त्याचा गळा चिरलेला आढळून आला. वाघमारे हा स्पा मालकालाही ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांनी उघड केले.

पोलिसकाका Video News: २६ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

'सैराट'ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…

मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…

हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…

The post स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka