Dailyhunt
स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात.

स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात.

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या पीडित युवतीने (वय २६) पोलिसांना दिलेला जबाब अखेर समोर आला आहे. युवतीने आरोपीकडे हात जोडून याचना केली होती.

बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून युवतीने विनंती केली. आरोपी दत्ता गाडे याला दादा मला जीवे मारू नको, अशी विनंती केली होती.

दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची युवतीला धमकी दिली होती. युवतीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केले होते. युवतीने प्रतिकार केला नसल्याचे पोलिस उपायुक्त आणि गृहराजमंत्र्यांनी वक्तव्य केले होते. मात्र, आरडाओरडा केल्याचा पीडितेने जबाब दिला. एसी एसटीला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याची ही तपासणी करण्यात आली.

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

वैद्यकीय समुपदेशक असल्याने पश्चिम बंगालच्या घटनेप्रमाणे आपल्याला ही मारून टाकतील अशी पीडीतेला भीती वाटत होती. त्यामुळेच दादा मारू नको अशी विनंती पीडितेने आरोपीकडे केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. दुसरीकडे आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत पीडितेवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते. त्यापैकी वकिलांनी केलेला एक दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितले.

दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये…
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात बलात्काराच्या घटनेपूर्वी फक्त 249 रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी दावा केल्याप्रमाणे युवतीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जे 7500 रुपये देण्यात आले, ते पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हा घडल्यानंतर दत्तात्रय गाडे याने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेऊन त्याचे बँक खाते, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी केली. दत्तात्रय गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले? संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का? या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला. मात्र, पीडित युवती कधीच दत्तात्रय गाडे याच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. तसेच दत्तात्रय गाडे हा युवतीला 7500 रुपये दिल्याचा जो दावा करत आहे, तोदेखील फोल ठरला आहे. कारण या घटनेपूर्वी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये शिल्लक होते. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचा पाय आणखी खोलात गेला आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…

आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…

पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन…

पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…

स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

The post स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka