Dailyhunt
तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं.

तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं.

खनौ (उत्तर प्रदेश) : एकाने आपण आयएएस अधिकारी असल्याचे भासवून दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लुटल्याची घटना हरदोई येथे घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन महिला अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हरिकेश पांडे याला अटक केली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

हरिकेश पांडे (रा. मुफरीद, जि. प्रतापगड) याने आपला दिव्यांग भाऊ मुकेश कुमार पांडे याच्या नावाने एका मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. त्या माध्यमातून त्याने या महिलांशी संपर्क केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने एका मॅट्रोमोनिअल साईटवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. त्यात आपण हरदोईमध्ये जॉइंट मॅजिस्ट्रेट असल्याचे लिहिले होते. हरिकेशने उन्नावमध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले. 11 फेब्रुवारी 2024 रोजी त्याने एका पीडितेशी संपर्क साधून तिच्याकडून एक लाख रुपये रोख घेतले आणि एक लाख 23 हजार 253 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर लगेचच आपली हरदोईवरून कासगंजला बदली झाल्याची बतावणी करणारा फोन या महिलेले केला. त्या नियुक्तीचे बनावट नियुक्तीपत्रही पाठवले. महिलेला संशय आल्यावर तिने हरदोईत चौकशी केल्यावर तिथे या नावाचे कुणी जॉईंट मॅजिस्ट्रेट नाहीत हे कळाले. मग तिने पोलिसांत तक्रार केली.

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपीने लखनौमधील एका महिला अधिकाऱ्याचीही अशाचप्रकारे फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून बनावट आयएएस नियुक्तीपत्र, पॅनकार्ड, पासबुक आणि हरदोईच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटबरोबर त्याचे एडिटेड फोटो जप्त केले आहेत.

एसपी नीरज कुमार जादौन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीने उन्नावमधील एक महिला अधिकारी आणि लखनौमध्ये तैनात असलेल्या आणखी एका महिला अधिकाऱ्याचीही फसवूणक केली आहे. पीडितेने पैसे परत मागितल्यावर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.’

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…

लखोबा लोखंडे! पुणे शहरातील एकाने 25 हून अधिक महिलांची केली फसवणूक अन्…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

The post तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka