कोलकताः पश्चिम बंगालमधील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकेने वर्गातच विद्यार्थ्यासोबत लग्न केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
आम्ही केलेले लग्न हे मानसशास्त्राशी जोडलेल्या एका प्रयोगाचे होते, असा दावा प्राध्यापिकेकडून करण्यात आला आहे. मात्र त्यावर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती नव्हती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, प्राध्यापिकेने वधूप्रमाणे पेहराव केल्याचे दिसत आहे. लग्नाचे विधीही वर्गात पार पाडले जात आहेत. यानंतर विद्यापीठाने सदर प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली होती.
लग्न करण्यात आलेला मुलगा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील वर्गात अशाप्रकारे लग्न लावणे कितपत योग्य आहे? असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला. २८ जानेवारी रोजी हे लग्न पार पडल्याचे सांगितले जाते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका होऊ लागल्यानंतर सदर प्राध्यापिकेने राजीनामा सादर केला आहे. विद्यापीठाबरोबर यापुढे काम करता येणार नसल्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहे, असे पत्र प्राध्यापिकेने पाठविले आहे.
दरम्यान, व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्यानंतर आपल्याला जबर मानसिक धक्का बसल्याचे प्राध्यापिकेने म्हटले होते. त्यापूर्वी महाविद्यालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. महाविद्यालयाने काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करते, असे प्राध्यापिकेने दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे. व्हायरल व्हिडीओबद्दल महाविद्यालयाला आधीच कल्पना होती, असा दावा केला जात आहे. मानसशास्त्रीय नाट्याचा हा प्रकार होता. मात्र व्हायरल व्हिडीवर वाद निर्माण झाल्यामुळे सदर प्राध्यापिकेला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…
तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं…
दहावीत शिकणारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का; आरोपी निघाला…
विद्यार्थीनी 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली अन्…
शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…
मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…
विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…
The post Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

