Dailyhunt
Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर.

Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर.

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात उफाळून आलेले टोळीयुद्ध आणि कोयता गँगच्या विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आंदेकर टोळीतील सदस्यांच्या आर्थिक स्त्रोतांची मुळे उखडून फेकल्यानंतर इतर टोळीतील सदस्यांकडे पुणे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे.

पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर पुणे पोलिसांनी आज (शुक्रवार) बुलडोझर चालवला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आर्थिक स्त्रोतांवर घाव घालण्याचे ठरवले आहे. मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यात किंवा तत्सम मोठ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याचे कुटुंब, त्याला आधार देणारे लोक आदींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रेकॉर्डवरील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर पुणे पोलिसांनी बुलडोझर चालवला. काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांकडून आरोपींच्या बांधकामावर बुलडोझर पॅटर्नचा अवलंब केला गेला.

आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत पोलिसांनी बांधकाम पाडले. सदर आरोपी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गुन्ह्यांमध्ये अटक असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. आता या परिसरात असणाऱ्या त्याच्या सगळ्या बांधकामावर कारवाई करत पोलिसांनी तिथे असलेले बांधकाम जमीनदोस्त केले आहे. आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण हा शहरातील मोठा गुंड आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे आणि गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खंडणी, मारहाण, दहशत पसरवणे आदी गुन्ह्यांत त्याचा समावेश आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अवैध मार्गाने जमा केलेली संपत्ती आदींवर बुलडोझर चालवण्याचे पुणे पोलिसांनी ठरवले आहे. जेणेकरून गुन्हा केला तर पुन्हा उभा राहणे कठीण आहे ही भीती संबंधितांच्या मनात बसायला पाहिजे, असा होरा पुणे पोलिसांचा आहे. यामुळे गुन्हेगारांची घाबरगुंडी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…

पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…

The post Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka