Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यशश्री शिंदे हिचा गहाळ मोबाईल सापडला; खळबळजनक खुलासे.

यशश्री शिंदे हिचा गहाळ मोबाईल सापडला; खळबळजनक खुलासे.

मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी सूत्रं वेगाने फिरवत कर्नाटकमधून दाऊद शेख या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली. आरोपी दाऊद शेखवर पोलिसांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेख याने दिली आहे.

यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊद याने कबुली दिल्यानंतरही पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आता आणखी सोपे होणार आहे. गहाळ झालेला मोबाईल सापडल्यामुळे या प्रकरणी आता आणखी खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी डाटा मिळवण्यासाठी लॅबकडे पाठवला आहे.

दरम्यान, यशश्री शिंदे (वय 22, रा. उरण) या युवतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. एकतर्फी प्रेमातून यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. आरोपी दाऊद शेख याच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…

Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…

यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka