Dailyhunt
हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात.

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात.

नाशिक : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि इच्छुकांना उमेदवारीची फेक ऑफर दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन तोतया अधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेश मिश्रा आणि गौरव नाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे.

दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पक्षाकडून तिकीट मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या दोघांनी नाशिकमधील एका विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळवून देण्यासाठी फोन केला होता. पीएमओ कार्यालयातून बोलतो आहे, असे सांगत त्या दोघांनी ते फोन केल्याचे फिर्यादी कडून सांगण्यात आले होते. अटक करण्यात आलेले हे दोन्ही संशयित आरोपी हे महाविद्यालयीन तरुण असल्याचे समोर आले आहे. त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. दिल्ली येथून या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सगळ्याच राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच फायदा घेत दोन महाविद्यालय तरुणांनी सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे विद्यमान आमदारांना फोन करुन 50 लाखांची मागणी केली. आम्ही पीएमओ कार्यालयातून बोलतो आहे, तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे असेल तर 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे दूरध्वनी वरून सांगण्यात आले. मात्र, विद्यमान आमदारांना शंका आल्याने त्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात तक्रार दिली होती. या घटनेची गांभीर्यता पाहून पोलिस आयुक्तांनी तपास गुन्हे शाखे युनिट 1 कडे वर्ग केला होता. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनेचा तपास केला असता, दोघांनाही दिल्लीहून ताब्यात घेतले आहे. तसेच, या दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहरात भाजपचे विद्यमान आमदार तसेच अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना फोन केल्याची कबुली दिली. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या जागावाटपाचा फायदा उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावरून अपहृत व्यक्तीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका…

हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…

The post हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka