बीड : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला 100 दिवस पूर्ण झाले असून याप्रकरणासह विविध घटनांमध्ये पोलीस तातडीने पाऊले उचलून कारवाई करत असल्याचे दिसून येते. वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर बीड पोलिसांनी खोक्याभाईच्याही मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी कारवायांवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
बीडमधील या गुन्हेगारी टोळीतील आरोपींमध्ये दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, मुद्दसर मन्सुर पठाण, सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले यांचा समावेश आहे. या टोळीने बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे केले आहेत.
16 जानेवारी रोजी वाहिरा ते पिंपळगाव रोडवरील गायरान जमिनीत या आरोपींनी आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्याप तीन जण फरार आहेत. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावे नष्ट करणे, रस्ता अडविणे अशा स्वरूपाचे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्याने आता या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…
बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…
बीडमध्ये अमानुष मारहाण! 'खोक्या' आला समोर अन् सांगितलं…
वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल; सनीने सगळचं सांगितले…
बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…
The post बीडमध्ये महिलांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीवर मकोका… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

