Dailyhunt
धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून.

धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून.

कोल्हापूरः मुरगूड (ता. कागल) येथील परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) या माध्यमिक शिक्षकाने त्यांच्या प्राध्यापिका असलेल्या पत्नी सविता परशराम लोकरे (वय ४५) यांचा रागाच्या भरात खून केल्याची घटना घडली आहे.

उच्चभ्रू वस्तीत कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीचा डोक्यात मुलाच्या सहकार्याने वरवंटा घालून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी अपूर्वा लोकरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार परशराम लोकरे व त्यांचा अल्पवयीन मुलगा याना मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साई कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत माध्यमिक शिक्षक परशराम लोकरे हा आपल्या प्राध्यापिका पत्नी सविता लोकरे यांच्यासह एक मुलगा व दोन मुलींसह बंगल्यात राहत होते. सुशिक्षित वातावरण असल्याने सर्वच मुले उच्च शिक्षित आहेत. परशराम आणि पत्नी सविता यांच्या मध्ये वारंवार कौटुंबिक कारणातून वाद होत होते. मंगळवारी (ता. १) सकाळी घरात चहापान सुरू असताना दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. मुलींनी सदरचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद विकोपाला गेला.

सविता वाद सुरू असताना घराच्या बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या शेड मध्ये भांडी घासण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी परशराम ही पोहचले त्यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगा ही बरोबर होता. त्या मुलाने आपल्या आईचे हात धरले आणि परशराम याने जवळ च असणारा वरवंटा घेऊन पत्नी सविता यांच्या डोक्यात घातला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी सहा पोलिस निरीक्षक शिवाजी करे हे पोलिस पथकासह पोहचले त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. सांयकाळी उशिरा सविता यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्तात परशराम आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला नेण्यात आले होते.

अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख जयश्री देसाई यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान त्यांच्याच मुलगी अपूर्वा लोकरे (वय २५) हिने आपले वडील परशराम व अल्पवयीन भाऊ याच्या विरोधात मुरगूड पोलिसात तक्रार दिल्याने या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…

कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, चांदी गायब अन्…

कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

कोल्हापूरमध्ये कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह तिघींचा मृत्यू…

कोल्हापूर हादरले! मुलाने सुऱ्याने वार करत केली आईची हत्या…

The post धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka