Dailyhunt
हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत.

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत.

रांची (झारखंड): लग्न करायला निघालेल्या प्रेमी युगुलाचा प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला असून, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रांची चाईबास येथील मुख्य मार्गावर NH 75 येथे रविवारी (ता. २४) दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

ट्रकने तीन जणांना उडवले आहे.

अपघातात प्रेमी युगुलाचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. इटीहास गावातील डुई कसाई गावात राहणार रमेश केराई आणि नरसिंह केराई हे दोघे कुलाबुरु गावात आले होते. रमेश आपल्या प्रेयसीला लग्न करायला घेऊन जाणार होता. नरसिंह दुचाकी चालवत होता. तर रमेश आणि त्याची प्रेयसी मागे बसले होते. ट्रिपलसीटने हे तिघेही जात असताना ट्रकने धडक दिली.

NH 75 वरील एका वळणावरुन दुचाकी जात असता समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले. ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आली आणि प्रियकर रमेश आणि त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जमुदा यांनी या घटनेची माहिती चाईबासा मोफसिल पोलीस ठाणे आणि चक्रधरपूर पोलिसांना दिली.

दरम्यान, मुफसिल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले आणि चौकशी केली. पोलिसांच्या ताब्यात आलेला ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. खरसावनचे आमदार दशरथ गगराई यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. लग्नापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…

पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्…

प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

The post हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka