Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्नाच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता.

लग्नाच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता.

मरावती: अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्याच्या मुलाचा उद्या (ता. १४) विवाह सोहळा असून, नवरदेव आज बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

फक्त पोलिसांसाठी! 'सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!'

काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा लग्नाच्या एकदिवस आधी बेपत्ता झाला आहे. वैभव मोहोड (वय 30) असे बेपत्ता झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. आज सकाळी साहित्य आणायला बाहेर जातो, असे सांगून गेलेला वैभव घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बेपत्ता झालेल्या वैभव याने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत. पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. दरम्यान, ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…

नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka