Dailyhunt
महाराष्ट्राचा सुपुत्राची शौर्यगाथा! मांडीत गोळ्या घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले.

महाराष्ट्राचा सुपुत्राची शौर्यगाथा! मांडीत गोळ्या घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले.

सांगली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्या मांडीत घुसल्यानंतर जवान रक्तबंबाळ झाला. सोबत असलेल्या सहकारी जवानाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तिसऱ्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आणि दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता.

दोन गोळ्या मांडीत घुसल्यानंतर जखमी झालेल्या जवानाने जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला. कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील येथील विनोद चव्हाण यांची ही शौर्यगाथा आहे. चव्हाण व त्याचा जखमी सहकारी प्रदीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

कुकटोळी येथील विनोद सुनील चव्हाण (वय २६) हे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स, मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारी (ता. २२) पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी जवान संदीप पांडुरंग गायकर हे हुतात्मा झाले, तर कुकटोळी येथील विनोद चव्हाण व उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हे त्यांचे सहकारीही जखमी झाले.

दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत, यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली होती. डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त दल जवळ येताच गोळीबार सुरू केला. यावेळी विनोदने ४८ गोळ्या झाडल्या होत्या. या चकमकीत विनोद यांच्या मांडीत दोन गोळ्या लागल्या होत्या, तर प्रदीप कुमार यांना छातीत एक गोळी लागली होती. दोघांवर जम्मू-काश्मीरमधील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, ते दोघेही सुखरूप आहेत.

महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा…

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

The post महाराष्ट्राचा सुपुत्राची शौर्यगाथा! मांडीत गोळ्या घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka