Dailyhunt
नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले.

नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले.

सिंधुदुर्ग : मालवणमध्ये नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले असून, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

प्रीती केळुस्कर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुशांत गोवेकर असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मालवण एसटी बसस्थानक परिसरात ही घटना घडली आहे. प्रीती केळुस्कर या एका शॉपमध्ये काम करत असताना पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपाचर सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्…

अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…

धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…

The post नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka