ठाणे : काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सरलांबे (ता. शहापूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पती संशय घेत होता आणि शिवीगाळ, मानसिक त्रास देत होता असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू-सासरा आणि दीर या चौघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती व सासरा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील कृतिका म्हात्रे हिचा विवाह काही महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील वैभव अधिकारी याच्या सोबत झाला होता. पण पती वैभव हा पत्नी कृतिकावर संशय घ्यायचा. तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, तू मला आवडत नाहीस असे बोलायचा. तिला शिवीगाळही करत असे. तर सासरा जनार्धन, सासू रत्ना, आणि दिर समीर याबाबत वारंवार टोमणे मारत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
शिवाय, बुलेट ट्रेनच्या प्रकरणात गेलेल्या जमिनीचे पैसे कधी येतील, असे वारंवार विचारून कृतिकाला शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. सासरच्या मंडळी कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कृतिका ने राहत्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली आहे. शहापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती व सासरा यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…
अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचा 'त्या' कागदाबाबत गंभीर आरोप…
युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
The post धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

