Dailyhunt
पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी.

पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी.

नाशिक : नाशिक शहर पोलिस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणी परीक्षेस गैरहजर राहिलेल्या उमेदवारांसाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अशा उमेदवारांनी रविवारी (ता.

३०) सकाळी ६ वाजता पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रिक्त ११८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार सात हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यासाठी दि. १९ ते २९ जून या दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेला अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. काही उमेदवार मैदानी चाचणीस गैरहजर राहिले. त्यामुळे अशा उमेदवारांना शहर पोलिसांनी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान ठाकरे स्टेडिअम याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उमेदवारांना लेखी अर्ज योग्य पुराव्यासह द्यावा लागेल. तसेच, येताना कॉल लेटर, अर्ज, सहा पासपोर्ट फोटो, आधारकार्ड आणि आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणण्याची सूचना आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता. २७) झालेल्या मैदानी चाचणीसाठी ७५० महिला उमेदवारांना बोलवण्यात आले होते. त्यापैकी २३१ महिला उमेदवार गैरहजर होत्या. तर ५१९ उपस्थित उमेदवारांपैकी ८५ उमेदवार उंचीत अपात्र ठरले, तर ४३४ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.


पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'

दरम्यान, नाशिक शहर पोलिस दलात ११८ जागांसाठी पाच हजार ५९० पुरुष, दोन हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार १९ जूनपासून हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर मैदानी चाचणी सुरू आहे. तर नाशिक ग्रामीणमधील ३२ रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. शहर पोलिसांची मैदानी चाचणी २९ जून पर्यंत सुरु राहणार आहे. शहरात सात उमेदवारांनी गुणांबाबत हरकत घेतली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने त्यांच्या हरकतींवर कार्यवाही करीत सुधारित गुणवत्ता यादी जाहीर केली.

राज्यातील मैदानी चाचणींचा निकाल जुनच्या महिना अखेरीस किंवा १ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे ज्या ठिकाणची भरती तात्पुरती स्थगित झाली, त्या ठिकाणी पुढील तारखा देत मैदानी चाचणी होत आहे. विविध जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतल्याने मैदानी चाचणी पूर्ण करण्यावर यंत्रणेचा भर आहे. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी ७ जुलै रोजी राज्यात एकाचवेळी लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर चालक पदासाठी १४ जुलैला लेखी परिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने पुर्वतयारी सुरु केली आहे.

जुलै महिन्यात लेखी परिक्षा झाल्यानंतर त्याच महिन्यात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु असतानाच ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान, विधानसभा निवडणूकीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे दीड महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या प्रशिक्षणार्थी पोलिसांची निवड आगामी विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासह गस्तीसाठी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे नियोजन सुरु आहे.

पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…

पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी…

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka